महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२५ साठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध; अर्ज प्रक्रिया सुरू | MPSC Van Seva Bharti 2026

महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा – २०२५ साठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण १४४ जागा उपलब्ध आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या माहितीनुसार ऑनलाईन अर्ज करावा.

पदाचे नाव – महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा – २०२५
पदसंख्या – १४४ जागा
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

शैक्षणिक पात्रता
उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणिशास्त्र, उद्यानविद्या, कृषिशास्त्र, कृषि अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, संगणक अॅप्लिकेशन, संगणक विज्ञान, पर्यावरणीय विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान या विषयांपैकी कोणत्याही विषयातील विज्ञान शाखेची पदवी असावी.
तसेच विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेत गणित विषयासह पदवीधर उमेदवार देखील पात्र राहतील.

वयोमर्यादा – ३८ ते ४३ वर्षे

अर्ज शुल्क
अमागास – रु. ५४४/-
मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग – रु. ३४४/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – १६ मार्च २०२६
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० मार्च २०२६

अर्ज कसा करावा

  • अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याच्या सूचना आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज सादर केल्यानंतर निर्धारित मुदतीत परीक्षा शुल्क भरावे.
  • शुल्क भरल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • अर्ज अंतिम तारखेपूर्वीच सादर करावा.
  • मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत PDF जाहिरात अवश्य वाचावी.

अधिकृत वेबसाईटhttps://mpsc.gov.in/

महत्त्वाच्या लिंक
PDF जाहिरातhttps://shorturl.at/mFMX0
ऑनलाईन अर्जhttps://shorturl.at/bqEQ1

भरतीविषयी अधिक माहितीसाठी अधिकृत सूचना तपासावी. इच्छुक उमेदवारांनी ही माहिती इतरांना देखील शेअर करून सरकारी नोकरीची संधी उपलब्ध करून द्यावी.

Leave a Comment