आरोग्य विभागात १४४० जागांसाठी भरती; ऑनलाईन अर्ज सुरू – Arogya Vibhag Recruitment 2026

आरोग्य विभाग भरती २०२६ – 1440 वैद्यकीय अधिकारी पदांसाठी मोठी संधी

महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागामार्फत वैद्यकीय अधिकारी पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 1440 जागांसाठी ही भरती होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

पदाचा तपशील

  • पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी (गट-अ)
  • एकूण पदसंख्या: 1440 जागा

शैक्षणिक पात्रता

वैद्यकीय अधिकारी पदासाठी उमेदवारांकडे एम.बी.बी.एस / बी.ए.एम.एस पदवी असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा

  • किमान वय: 18 वर्षे
  • कमाल वय: 43 वर्षे

अर्ज शुल्क

  • अराखीव प्रवर्ग: रु. 1000/-
  • मागासवर्गीय / आ.दु.घ. / अनाथ / दिव्यांग प्रवर्ग: रु. 700/-

वेतनश्रेणी

  • वैद्यकीय अधिकारी (गट-अ): रु. 56,100/- ते 1,77,500/-

अर्ज करण्याची पद्धत

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामधील माहिती पूर्ण व अचूक भरावी. अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अंतिम तारखेनंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2026 आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सविस्तर सूचना अधिकृत संकेतस्थळावर वाचाव्यात.

महत्त्वाच्या लिंक

या भरतीसंदर्भातील परीक्षेचा नमुना, अभ्यासक्रम आणि इतर सविस्तर माहिती अधिकृत जाहिरातीत उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा.

ही माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही सरकारी नोकरीची संधी मिळू शकेल.

Leave a Comment